
जलसंपदा
पाण्याच्या अस्तित्वाशी सर्व संस्कृतींचा उगम जोडलेला आहे. अनेक गावे नद्यांच्या किंवा तलावांच्या काठावर वसलेली आहेत. शेती, स्वच्छता, जनावरे आणि पिण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. ७१ वर्षांनंतरही अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न कायम आहे. काही ठिकाणी अति उपशामुळे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाणी कमी असेल तिथे जपून वापरणे आणि मुबलक ठिकाणी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.