दान देऊन कोणी गरीब होत नाही !

Causes grid view


परिचय


माणसाला जगण्यासाठी स्वच्छ शिजवलेले अन्न, शुद्ध पाणी, उत्तम आरोग्य, शिक्षण, निवारा आणि दळणवळण यासारख्या मुलभूत सुविधांची गरज असते. या सुविधा निर्माण करण्यासाठी त्याला सतत उर्जेची आवश्यकता असते. ही उर्जा सध्याच्या आधुनिक युगात बऱ्याच वेळा वीज किंवा ज्वलनशील पदार्थ (कोळसा, वायू, पेट्रोल/डीझेल, लाकूड इ.) वापरून निर्माण केली जाते. या उर्जा स्त्रोतांना पारंपारिक उर्जा स्त्रोत असे म्हटले जाते. परंतु देशातील ग्रामीण भागामध्ये अजूनही नियमित वीज पुरवठा नाही, काही गावात वीज उपलब्ध सुद्धा नाही. जळणासाठी लाकूडफाटा वापरल्यामुळे बरीच वृक्षतोड झाली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागात गो-वंशाच्या माध्यमातून बायोगॅस निर्मिती, सौर-उर्जा आणि पवन-उर्जा यांचा उपयोग आधुनिक तंत्रज्ञान वापरून दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी नक्की केला जाऊ शकतो. म्हणून आपल्या गावात उपलब्ध असलेल्या अशा उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा.


कार्यक्रम




केस स्टडीज