जलसंपदा
जल संपदा- गेल्या काही वर्षांत पडत असलेल्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विषयात प्रत्यक्ष काम सुरू आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची , शेती व जनावरांची पाण्याची व्यवस्था करण्यावर प्रामुख्याने काम केले आहे व सुरू आहे, यामुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली आली तसेच असंख्य जनावरांना पाण्याची वर्षभर व्यवस्था करायला सोपे झाले तसेच अनेक गावांमध्ये पर्जन्यमापक च्या साह्याने पावसाच्या पाण्याची मोजणी करण्यात येते त्यामुळे पाण्याचा आराखडा करायला गावात सोपे जाते.