ग्रामविकास ला योगदान म्हणजे देशाच्या ग्रामीण विकासाला योगदान.

यशोगाथा

Centered Image


नमस्कार दि २० एप्रिल २०२४ रोजी स्वावलंबन विषयाचे पुणे विभागासाठी प्रशिक्षण अभ्यासवर्ग झाला या वर्गासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड,बारामती पुणे ग्रामीण जिल्ह्याचे ४५ महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील पैसा गावातच राहावा या उद्देशन ही शिबिर घेण्यात आले होते.या प्रशिक्षणामध्ये लिक्विड सोप ,विविध प्रकारची फिनेल , डिश वॉशर,साबण ,कपडे धुण्याचा साबण फ्लोर क्लिनर ई चे प्रॅक्टिकल स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले या साठी श्री लक्षमन पात्र यांनी ही प्रशिक्षण दिले .या वर्गासाठी श्री मधुकर भोसले प्रांत संयोजक सुनील व्हरांबळे प्रांत सह संयोजक ,अश्विनी अंबिके ,विजय वरुडकर ,गीताराम कदम ,आशुतोष जोशी प्रांत मंडल सदस्य उपस्थित होते .हा प्रशिक्षण वर्ग अहिल्यादेवी शाळा शनिवार पेठ येथे संपन्न झाला.