ग्रामविकास ला योगदान म्हणजे देशाच्या ग्रामीण विकासाला योगदान.

Causes grid view


परिचय


जगातील सर्व संस्कृतींचा उगम हा पाण्याच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. म्हणूनच आपल्याला बरीचशी गावे सुद्धा नदीच्या किंवा तलावाच्या काठी आढळतात. शेतीसाठी पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या व्यतिरिक्त मानवाला स्वच्छतेसाठी, जनावरांसाठी आणि पिण्यासाठी पाणी आवश्यक असते. या सर्व कारणांमुळे पाण्याला “जीवन” असे म्हटले जाते. स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे झाली तरी अजूनही हजारो गावातील पाण्याचा मुलभूत प्रश्न सुटलेला नाही. ज्या गावांना पाणी वर्षभर उपलब्ध होते तिथे पाण्याचा अति-उपसा झाल्यामुळे (बोअर द्वारे) वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच पाण्याचा भूगर्भातील साठा खूप खोलवर जावून पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असेल, तर ती मिटवण्यासाठी आणि पाणी मुबलक असेल तर त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी काम करायची गरज आहे. आता तर पाण्याची समस्या अतिशय भीषण झाली आहे. ही आपण लातूर ळा ट्रेन ने पानी नेल्याने समजली आहे.

अधिक वाचा ->

कार्यक्रम