शेतीसाठी सगळ्यात महत्वाचे संसाधन म्हणजे जमीन. हा निसर्गाकडून मिळालेला एक अनमोल ठेवा आहे. चांगली जमीन असेल तरच चांगली शेती केली जाऊ शकते. म्हणून जमिनीची सुपीकता वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. गेल्या २५-३० वर्षांत जमिनीची प्रत वेगाने खालावल्याचे असल्याचे दिसून येते. याला रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अति-वापर, जीवाणूंची घटणारी संख्या आणि सेंद्रिय कर्ब कमी होणे अशी ४ प्रमुख कारणे दिसून येतात. पावसाच्या काळात जमिनीचे संवर्धन (मृदा संवर्धन) करणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असते. जमिनीचा सगळ्यात सुपीक थर हा पावसाच्या पाण्याने वाहून जात असतो म्हणून अशी माती आपल्या शेतातून आणि गावातून वाहून जाऊ नये यासाठी मृदा-संधारण आवश्यक असते या साठी अक्षय कृषि परिवार यांच्या मार्फत देश पातळीवर भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान गेल्या ३ - ४ वर्षापासून राबवले जात आहे.