वेडकाळापासून भारतीय संस्कृतीमध्ये देशी गायीला अनन्य साधारण महत्व आहे. देशी गायीपासून मिळणाऱ्या सर्व वस्तूंचा जसे दूध, दही, तूप, ताक, गोमूत्र (पंचगव्य) मानवी जीवनात उपयोग करता येतो. तिच्यापासून मिळणारे दूध (A2) हे जगातील सर्वोत्तम दूध असल्याचे आता वैज्ञानिक दृष्ट्या देखील सिद्ध झाले आहे. या खेरीज देशी गाईच्या शेण आणि गोमुत्र यांचा वापर शाश्वत शेतीसाठी गरजेचा आहे. किंबहुना त्यांचा नियमित वापर केल्याशिवाय शाश्वत शेती होऊच शकत नाही. गाय आपल्या शेतीला लागणारे बैल सुद्धा देते. अशा प्रकारे तिच्या अनंत गुणांमुळे तिचे पूजन केले जाते आणि तिचे वर्णन करताना “गोमय वसते लक्ष्मी” असे म्हटले जाते. परंतु दूध उत्पादनाच्या हव्यासापोटी आणि शेतातील यांत्रिकीकरण झाल्यामुळे गेल्या ३-४ दशकात देशी गोवंशाचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास झाला आहे. त्यामुळे अजून एक संकट या विश्वासमोर समोर येवून उभे आहे.